१. जुन्या जीर्ण झालेल्या सातभाई मोकाशी मंगल कार्यालयाच्या जागेवर एक नवीन बहुउद्देशीय इमारत बांधण्याच्या उपक्रमाला मंडळाने प्राधान्य दिले. हा प्रकल्प कार्यान्वित करण्यास सुरुवात केली आहे. काही अंशी मंडळ यामध्ये दृश्य अशी कामगिरी करू शकले आहे.
२. या बहुउद्देशीय इमारतीचा उपयोग लग्न, मुंज, अथवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी करण्याचा मंडळाचा मानस आहे. सध्याच्या घडीला श्रावणी, दासबोध पारायण, भजन, कीर्तन, अशा कार्यक्रमासाठी ऋग्वेद भवनाचा हॉल उपलब्ध आहे.
३. सदर इमारत ही लग्न, मुंज अथवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी (छोट्या सभा, समारंभ, वाढदिवस, नामकरण आदी) उपलब्ध करून देण्याचे प्रयोजन आहे.
४. सन २०१४ मध्ये मंडळाच्या लगत असलेला ५०० चौरस फुटांचा भूखंड मंडळाने विकत घेतलेला आहे.
५. सदर जागेत पूर्वी एक विहीर खोडलेली असून त्यास भरपूर पाणी आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई भासणार नाही. सदर विहिरीचे पक्के बांधकाम करून त्यास वर जाळी बसवलेली आहे. मंडळाने सदर पाण्याचा वापर बांधकामासाठी केला.शिवाय शेजारच्या दोन इमारतींच्या बांधकामासाठीही त्याचा वापर झाला. त्यामुळे भविष्यातही पाण्याची टंचाई भासणार नाही.
६. वाचनालय-
मंडळाने या इमारतीत वाचनालयासाठी एक जागा निश्चित केलेली आहे. वाचनालयामध्ये वेद,उपनिषद, धर्मसिंधु, पुराणे, तसेच अन्य दुर्मिळ ग्रंथांसह कथा, कादंबर्या यासारखी पुस्तके, ठेवण्याचे प्रयोजन केले आहे. अशा पुस्तकांचा अभ्यासूंना लाभ घेता येईल.
७. गेल्या दोन वर्षापासून ‘आदर्श कुलोपाध्याय’ हा पुरस्कार मंडळातर्फे कै. सिद्धेश्वर शास्त्री – धर्माधिकारी यांच्या नावे दिला जातो. ही परंपरा पुढेही चालू राहील.
८. इमारतीस प्रशस्त असा जिना आहे. त्याचबरोबर उद्वाहक (लिफ्ट) उभारण्याचे काम सुरु आहे. ते लवकरच पूर्ण होईल.
९. पहिल्या मजल्यावर ३ हजार चौरस फुटांचा प्रशस्त हॉल आहे. त्यात एक कायमस्वरूपी मंच व ८०० लोक बसतील अशी योजना आहे.
१०. दुसर्या मजल्यावर वधू- वर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या आहेत. त्याशेजारी भोजनासाठी प्रशस्त जागा आहे.तसेच कार्यालयासाठी खोली आहे.
११. शेजारील एक जागा सपाट करून त्याठिकाणी बहुमजली इमारत बांधण्याचे प्रयोजन आहे. सदर इमारतीत तळमजल्यावर शौचालय, वरच्या मजल्यावर प्रशस्त किचन व वाचनालय तसेच दुसर्या मजल्यावर अभ्यागतांसाठी निवासस्थान उपलब्ध करून देण्याचे प्रयोजन आहे.
१२. गरम पाण्यासाठी पाण्याच्या टाक्यांसह सौरयंत्र बसविण्याचे प्रयोजन आहे. पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र नळ पालिकेकडून घेतला आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी जल शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात येईल.
१३. बेसमेंटमध्ये पार्किंगसाठी जागा आहे. त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात येतील.
१४. मुख्य हॉल तसेच इतर ठिकाणी देव देवतांच्या तसेच सत्पुरुष यांची चित्रे असावीत. यासाठी द्नागीदारांनी अशी चित्रे देणगी स्वरुपात दिली तर स्वागतच आहे.
Post a Comment
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.