Halloween Costume ideas 2015

श्री समर्थ मंडळ ( ट्रस्ट ), अहमदनगर संचालित...

सातभाई मोकाशी मंगल कार्यालय ते ऋग्वेद भवन ............. एक प्रवास

इसवी सनाच्या 1960 च्या सुरवातीस अहमदनगर मधील ब्राम्हण मंडळी कधी नव्हे ती एकत्र आली आणि त्यांनी एकमताने (हे ही एक विशेष) ठरविले की एक ब्राम्हण मंडळ स्थापन करावे. त्यांच्या समोर आदर्श होता तो समर्थ रामदास स्वामींचा. त्यानुसार त्यांनी मंडळाचे नामकरण ‘श्री. समर्थ मंडळ ट्रस्ट’ असे निश्चित केले व त्यास सरकारकडुन अनुमती मिळविली.
संसार त्याग न करता । प्रपंच उपाधि न सांडिता ।
जनामध्ये सार्थकता । विचारेचि होय ।।
या समर्थ रामदास स्वामीच्या उक्तीने प्रेरीत होऊन आपला प्रपंच सांभाळुन सर्वांचे विचार एकत्र करुन कार्य करावे ते ही लोकापयोगी असावे अशा उद्देशाने सर्वानी दरमहा पाच रुपये भिशी सुरु केली. या भिशीचा आर्थिक लाभ कोणाला ही न मिळता फक्त श्री समर्थ मंडळाला होईल ही भावना होती. जमा रकमेतुन सार्वजनीक कार्यासाठी एक वास्तु उभी करण्याचे स्वप्न त्यांनी पाहीले. परंतु जमा रक्कम व जमीनीची किंमत यांचे प्रमाण व्यस्तच राहिले. स्वप्न पुर्तीची आशा मावळती की काय? असा प्रश्न पडला. परंतु अशा प्रसंगी शहरातील दोन उदार धनिकांनी हा प्रश्न सोडवीला. त्यांनी प्रत्येकी ७५००/- रु देऊन चितळे रोड वरील सि.स.नं. 5806 ही जागा 15 हजार रुपये देऊन श्री समर्थ मंडळाचे नावे खरेदी करुन दिली. (5500 चौ. फुट) असे औदार्य दाखवणा-या धनिकांची नावे श्रीमान बाळासाहेब सातभाई व श्रीमान गोपळराव मोकाशी ही होत. जागा खरेदी झाल्यानंतर मंडळाने धनिकांना विनंती केली की, आपली रक्कम यथा शक्ती  व यथावकाश परत करु, परंतु या विनंतीला त्यांनी नम्रपणे नकार दिला व दिलेले दान परत घेणे योग्य नाही असे त्यांनी सांगीतले.
श्री समर्थ मंडळ ट्रस्टकडे आता स्वत:ची जागा होती. या जागेवर सार्वजनीक कार्यासाठी इमारत उभी करण्याचे ठरवीले. अहमदनगर मध्ये पाण्याची तीव्र टंचाई त्याकाळीही होती. जागेमध्ये एक विहिर खोदली सुदैवाने त्यास पाणी लागले. विहरीस जिवंत झरे असल्याने पाणी भरपुर प्रमाणात उपलब्ध झाले. एक दुमजली लाकडी इमारत मंडळाने उभी केली.
विहिरी बाबत सांगावयाचे म्हणजे बरीच वर्षे या विहिरीच्या पाण्याचा उपयोग झाला नाही. मात्र अलिकडच्या काळात नवीन इमारत बांधतांना या विहिरीच्या पाण्याचा बांधकामासाठी उपयोग झाला. आज ही विहिर व्यवस्थित बांधली व त्यावर झाकण बसविले आहे. सध्याच्या इमारतीचा पुर्णपणे वापर झाला तरी पाण्याची कमतरता भासणार नाही असा जलस्त्रोत मंडळाकडे आहे.
5500 चौ. फुट जागेत एक छोटेखानी इमारत बांधली त्याचा उपयोग मंगल कार्यालयासाठी करण्याच्या उद्देशाने त्याचे नाव "सातभाई मोकाशी मंगल कार्यालय" असे ठेवुन मंडळाने उदार धनिकाच्या ऋणात राहणे पसंत केले. या वास्तुत लग्न, मुंज, श्रावणी, दासबोध पारायण असे अनेकविध उपक्रम करता येऊ लागले यात लोकांचा सहभाग ही बाब महत्वाची.
काळाच्या ओघात शहरात अन्य ठिकाणी सोयीनी युक्त अशी मंगल कार्यालये (अथवा हॉल) उभी राहिली. या छोटेखानी वास्तु ती जुन्या पद्धतीची व लाकडी इमारतीकडे, मंगल कार्यालयाकडे लोक फारसे फिरकले नाही. लोकांना सातभाई मोकाशी मंगल कायालय अपुरे वाटु लागले.
साधारणपणे 1966-67 च्या सुमारास शहरातील काही मंडळांनी एकत्र येऊन शाळा सुरु करण्याचे ठरविले या मंडळीमुळे देखील समर्थ रामदास स्वमीचा आदर्श होता. त्यांनी "समर्थ शिक्षण संस्था" या नावाने संस्था सुरु केली. शाळेसाठी त्यांना इमारत नव्हती त्यांनी मंडळास सातभाई मोकाशी मंगल कार्यालयाची जागा शाळेसाठी देण्याची विनंती केली व श्री. समर्थ मंडळाने ती देऊ केली. बरीच वर्षे शिक्षण संस्थेने या वास्तुत शिक्षणकार्य केले. जुनी व लाकडी इमारत असल्याने ती जीर्ण झाली. दरम्यानच्या काळात शिक्षण संस्थेने स्वत:ची इमारत बांधली व इ.स. सन 2005 मध्ये श्री समर्थ मंडळाकडे वास्तु हस्तांतरीत झाली.
आता या जुन्या वास्तुच्या जागी नवी इमारत बांधणे क्रमप्राप्त होते. पुन: प्रश्न आला आर्थिक निधीचा. जुना इमारत पाडुन त्या ठिकाणी नविन इमारत बांधणे हे फार कष्टाचे व खर्चिक प्रकरण होते. समर्थ रामदास यांचे अनुयायी असल्याने ट्रस्टच्या सभासदांनी हाती "झोळी" घेतली व निधी जमविण्यास सुरुवात केली. झोळीमध्ये आलेले यथाशक्ती दान हे इमारतीचे काम सुरु करण्यास योग्य आहे असे वाटल्याने इ.स. 2009 मध्ये जुनी इमारत पाडुन नविन इमारतीचे बांधकाम करण्याचे ठरविले. या कामी संस्थेच्या सभासदानी विनामुल्य सेवा दिली या मध्ये श्री. संजय सोवनी यांनी आर्किटेक्टची भूमीका पार पाडली तर आर.सी.सी. व स्ट्रक्चरल डिझाईन ची जबाबदारी श्री. अविनाश कुलकर्णी यांनी सांभळली, श्री धोंगडे साहेब यांनी पालिकेच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले. श्री. सुरेद्र धर्माधिकारी यांनी इमारतीच्या बांधकामचे सुपरव्हिजन केले. आणखी चार व्यक्तींचा उल्लेख करणे आवश्यक आहे. श्री रसाळ, श्री मकरंद कुलकर्णी, श्री. राजाभाऊ मुळे व श्री जयदीप कुलकर्णी यांच्या सुयोग्य अशांच्या मार्गदर्शनामुळे इमारतीचे बांधकाम रुळावर नव्हेतर सुरळीतपणे चालु राहिले.
या सर्वांनी आपला अमुल्य वेळ व प्रत्यक्ष सहभाग विनामुल्य दिला त्याबद्दल संस्था ऋणी आहे.
इस. 2014 मध्ये संस्थेच्या लगतचा सि.स.नं. 5810 हा 500 चौ. फुटचा भूखंड विक्रीस होता. संस्थेने तो विकत घेतला.
2009 ते 2015 या काल खंडात संस्थेचे बांधकाम उपलब्ध निधी नुसार चालु रहिले इमारतीचा मुख्य सांगाडा उभा राहिला. त्यातील तळ मजला व पहीला मजला ठीक ठाक करुन तळ मजल्यावरील सुमारे 2150 चौ. फुट जागा देना बँक या राष्ट्रीयकृत बँकेस भाडे तत्वावर दिली. किमान उत्पन्न सुरु व्हावे या उद्देशाने निर्णय घेण्यात आला. पहिल्या मजल्यावरील 3000 चौ. फुटाचा हॉल झाला त्याची तसेच बँकेचा भाग वगळता इतर जागेतील कामे निधी अभावी करता आली नाहीत. आपल्या संस्कृती व परंपरेनुसार दि. 15/02/2015 रोजी वास्तुशांती करण्यात आली व जागेचा वापर बँकेसाठी तसेच हॉलसाठी वापर (अर्धवट स्थितीत असुन) सुरु केला.
नविन सि.स.नं. 5810 व मुख्य इमारतीत बांधकामाच्या तसेच सोईच्या दृष्टीने काम अपूर्ण आहेत उदाहरणार्थ.
1. बेसमेंट मध्ये पेव्हर ब्लॉकचे काम
2. फॉल्स सिलींग, स्टेज, खुच्र्या, ध्वनीवर्धक तसेच एको प्रुफ सिस्टीम, उदवाहक (लिफ्ट) रंग रंगोटी
3. सुसज्ज पाकगृह
4. भोजन गृहासाठी वेगळी व्यवस्था
5. वाचनालय, अभ्यागतासाठी सुसज्ज निवासस्थान, टॉयलेट, सोलर वॉटर हिटर सिस्टिम इ.
या संपूर्ण कामसाठी निधी अपेक्षीत आहे. श्रावण महिन्यात घरोघरी वाचल्या जाणा-या कहाणीनुसार प्रपंचाची गरज भागवून खुलभर दूध देणा-या म्हतारीच्या दुधाने मंदीराचा गाभारा दुधाने पूर्ण भरला तव्दत सर्वानी आपला प्रपंच सांभाळुन खुलभर दूध म्हणजेच अल्पसा निधी या सार्वजनिक कार्यास दिला तर हे काम लवकरच पूर्णत्वास जाईल यात शंका नाही.
संस्थेचे देना बँक अहमदनगर येथे खाते आहे त्याचा अकौंट नंबर 003110025170 असा आहे. बँकेचा IFSC कोड BKDN0510031 असा आहे. दान देतांना शक्यतो चेकने रक्कम द्यावी अन्यथा सरळ वरील अकौंटवर आपल्या बँके मार्फत चेक अथवा रोखीने भरली तरी चालेल. रोख रक्कम फक्त देना बँकेच्या शाखेत भरता येईल अन्य ठिकाणी चेकचा वापर करावा लागेल.

अच्युत सदाशिव पिंगळे 
अध्यक्ष - श्री समर्थ मंडळ ट्रस्ट 
अहमदनगर 
शब्दांकन - आर.डी. मुजुमदार 
सोबत -  नियोजीत इमारतीचे संकल्प चित्र.

Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright 2012 - 2022 By ऋग्वेद भवन Designed By Kedar Bhope Mo.+91 8055373718. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget