श्री समर्थ मंडळ (ट्रस्ट)
आपल्या ब्राम्हण समाजाची "श्री समर्थ मंडळ " ट्रस्ट या नावाची संस्था आहे. तिचे धर्मादाय आयुक्त नगर यांचेकडे नोंद केलेली आहे हे आपणास माहित आहे. आपल्या संस्थेची चितळे रोड, (डॉ.ताम्बेसमोर ) स्वमालकीची अंदाजे ५ हजार स्केअर फुट जागा आहे. संपूर्ण इमारत जुनी झाल्याने , धोकादायक झाल्याने पडली असून सध्या रिकामा प्लॉट झाला आहे.
आपली संस्था नगरमधील एक जुनी व सुपरिचित अशी संस्था
आहे."सातभाई मोकाशी मंगल कार्यालय " या नावाने ती परिचित आहे. श्री.मोकाशी व श्री.सातभाई या नगरमधील थोर परिवारांनी मौंज, लग्न व इतर धार्मिक उपक्रमांसाठी हि जागा संस्थेस देणगी दिली आहे. त्यावेळच्या अन्य समाज बांधवांनी या स्तुस्त्य उपक्रमास यथाशक्ती हातभार लावून सहकार्य केले आहे. त्यामुळे १९६० साली हि
संस्था उभी राहू शकली आहे. या जागेत पूर्वी अनेक लग्न, मौंजी, श्रावणी, दासबोध पठण व इतर धार्मिक कार्यक्रम झालेले आहेत. समाजातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी संस्थेने वेळोवेळी आर्थिक सहकार्य केले आहे. तसेच दासनवमी निमित्त समर्थ वाड्मयाचे समाजाकडून चिंतन व्हावे म्हणून पाठांतर, कथाकथन, सूर्यनमस्कार इ. स्पर्श आयोजित
करून विद्यार्थी अवस्थे पासून समर्थ विचार रुजवण्याचा संस्थेने यशस्वी प्रयत्न केला आहे. आपल्या कुटुंबातील जेष्ठ व्यक्तींना आजही याचे स्मरण असेल.
आपल्या समाजाच्या वधूवर सूचक मंडळाचे कामकाज श्री. गोविंदराव क्षीरसागर (गायकवाड कॉलनी, सावेडी) हे विनामुल्य पाहत असून त्यांचा फोन नं.0241 २४२९७४५ आहे.दुपारी ४ ते ५ या वेळेत समाजबांधव
याचा लाभ घेऊ शकतात.
कै. . बाबुराव धर्माधिकारी, भगवानराव धर्माधिकारी, सिदू काका
धर्माधिकारी, डॉ.होशिंग, हरिभाऊ सोमाणी, डॉ.उदास, राजूरकर,
काकासाहेब चिंचोरकर, डॉ.यादवाडकर, केशवराव सारोळकर, मोकाशी, वस्ताद पिंगळे,बाळासाहेब सातभाई,यशवंतराव भालेराव, भालजीकाका पारखी, दंडवते,मा.श्री मामासाहेब हातवळणे,इ. जेष्ठ व्यक्ती आपल्या
संस्थेचे धडाडीचे पदाधिकारी होते, हि संस्थेच्या अभिमानाची गोष्ट आहे.
सध्याही नगरमधील व नोकरी निमित्त बाहेरगावी गेलेल्या ब्राम्हण
समाजाला "श्री समर्थ मंडळ" या आपल्या संस्थेबद्दल आस्था आहे, प्रेम आहे, व संस्थेला पूर्वीचे वैभवाचे व भरभराटीचे दिवस यावेत,हि तळमळ आहे. मध्यंतरी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होऊन नवीन
कार्यकारिणी अस्तित्वात आली आहे. नवीन कार्यकारिणीने अड्व्होकेट श्री अच्युतराव पिंगळे (अध्यक्ष ) यांच्या नेतृत्वाखाली संस्थेला पूर्वीचे
वैभव प्राप्त करून द्यायचे असा दृढ निश्चय केला आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या आशीर्वादाने व सर्व समाजबांधवांच्या संपूर्ण सहकार्याने हा दृढ निश्चय पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
सध्या संस्थेचे कोर्ट कचेर्यांमधीलसर्व प्रकाराने मिटली आहेत. संस्थेच्या जागेत कुणीही भाडेकरी नाही व जागा पूर्णपणे मोकळी आहे. संस्थेचे
कोर्पोरेशांचे कर बरेच थकले होते. ( अंदाजे ५५ हजार रुपये) ते सर्व
संस्थेने एक राक्क्मेने भरले आहेत, त्यामुळे कुठलीही थकबाकी नाही. धर्मादाय आयुक्त (चैरिटी कमिशनर ) यांच्याशी सातत्याने संपर्क साधून त्यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने संस्थेने सर्व पूर्तता केलेली आहे व
करीत आहे.
मध्यंतरी समाजातील बांधकाम क्षेत्रातील मान्यवरांची एक अनौपचारिक बैठक संस्थेने घेतली. त्यावेळीही सर्व मान्यवरांनी इमारत
बांधकामाबाबत पूर्ण सहकार्य करण्याचे काबुल केले आहे. चितळे रोड
सारख्या मध्यवर्ती ठिकाणी संस्थेची स्व मालकीची जागा आहे. तिथे
'ऋग्वेद भवन' नावाची हि शानदार इमारत उभी करणे हे संस्थेचे ध्येय आहे. तळमजल्यावरील जागा बँकेस भाड्याने द्यावयाची आहे. पहिल्या मजल्यावर पूर्वीप्रमाणे सातभाई मोकाशी मंगल कार्यालय सुरु करून
लग्न, मौंज, इ धार्मिक कार्यक्रमांसाठी कार्यालय उपलब्ध करून द्यावयाचे
आहे. दुसऱ्या मजल्यावर श्री समर्थ रामदास स्वामींचे वाड्मय, धार्मिक पुस्तके, इ. ( लायब्ररी) तसेच बाहेर गावावरून येणाऱ्या रामदास स्वामी भक्तांसाठी तसेच साधू संत, थोर व्याख्याते, विद्वान यांची निवास
व्यवस्था करावयाची आहे. तसेच दासनवमी, निरनिराळ्या
व्याख्यानमाला,प्रवचने, कीर्तने, दासबोध पारायण, श्रावणी,इ धार्मिक कार्यक्रम करावयाचे आहेत. भूमिपूजन सज्जनगड येथील समर्थभक्त
मोहनबुवा रामदासी यांच्या शुभहस्ते करण्याचा मानस आहे. तसेच मुंबई व नाशिक येथी समाजबांधवांना निमंत्रित करणार आहे.
वरील सर्व आराखडा ढोबळ मानाने ठरविला आहे. सभासदांना पूर्ण
विश्वासात घेऊन, वेळोवेळी विचार विनिमय करून, बांधकाम
व्यावसायिकांशी चर्चा करून व परिस्थितीनुरूप योग्य ते बदल केले
जातील हि समाज बांधवांनी खात्री ठेवावी.
आव्हान मोठे आहे, बजेट मोठे आहे ( अंदाजे ७० ते ८० लाख रुपये) मात्र श्री समर्थ रामदास स्वामींचे आपण अनुयायी आहोत. हे आव्हान आपण सहज पेलू असा विस्वास आहे. परंतु हे एकात्यादुकात्याचे काम नाही. सर्व समाज बांधवांचे योगदान अपेक्षित आहे. आपण सभासद नोंदणी व इमारत निधी हे दोन विषय प्रामुख्याने हाती घेतले आहेत. १००० रु. (
रुपये एक हजार फक्त ) भरून आपण आजीव सभासद होऊ शकता. तसच इमारत निधी यथाशक्ती आहे. आपण रोख पैसे देऊ शकता किंवा "श्री
समर्थ मंडळ ( ट्रस्ट), नगर" या नावाने क्रॉस चेक दुये शकता. याची
आपणास पावती दिली जाईल. आतापर्यंत शेकडो समाज बांधवांनी
आजीव सदसत्व स्वीकारले आहे. तसेच महिलांचा हि सहभाग आहे.
आसे अतीत अभ्यागत l जाऊ नेदी जो भुकिस्त l
यथानुशक्त्या दान देत l तो सत्वगुण ll
वरीलप्रमाणे सविस्तर माहिती, आराखडा तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या काही सूचना असल्यास अवश्य कराव्यात.
तुमचे सर्व प्रकारचे सहकार्य अपेक्षित आहे. क्रुपय तुम्ही आजीव सभासद व्हा, आपल्या समाज बांधवांना, नातेवाईकांना, मित्रांना, परिचितांना
माहिती द्या. व आजीव सभासद होण्यास प्रवृत्त करावे हि नम्र विनंती.
श्री समर्थ मंडळ (ट्रस्ट)
ऋग्वेद भवन सातभाई मोकाशी मंगल कार्यालय
चितळे रोड अहमदनगर .